आम्ही तेली
आम्ही तेली

आम्ही तेली

जय संताजी, 🙏🏻मी लक्ष्मण गंगाधरराव माळवंतकर आम्ही तेलीहा App सर्व पोटजातीतील समाजबांधव एकत्र येण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. ह्या App च्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व पोटजातीतील समाजबांधव यां

Android Android Social »
( 336 ratings )
Price: $0
Name आम्ही तेली
Publisher
Genre Social »
Size 1.577.607 bytes
Version 1.2
Update 2022-10-10
आम्ही तेली is the most famous version in the आम्ही तेली series of publisher
Mod Version 1.2
Download
Rate this post
जय संताजी, 🙏🏻
मी लक्ष्मण गंगाधरराव माळवंतकर
“आम्ही तेली”
हा App सर्व पोटजातीतील समाजबांधव एकत्र येण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. ह्या App च्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व पोटजातीतील समाजबांधव यांच्याशी संपर्कात राहू शकतो. प्रत्येक जिल्हामध्ये आपला समाज बांधव बहुसंख्येने आहे. आज आपण प्रत्येक
क्षेत्रात अग्रेसर आहोत, जसे की नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण. आता आवश्यकता आहे की आम्ही एकत्र येऊन कार्य करण्याची व आपली शक्ती दाखवण्याची. त्यासाठी हा App तयार करण्यात आला आहे. या धावपळीच्या जीवनात कुठल्याही व्यक्तीकडे वेळ नाही. त्यामुळे समाजातील घडामोडी आपल्याला कसे कळणार परंतु प्रत्येकाकडे मोबाईल आहे.याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून
समाज बांधवांना APP व्दारे घरी बसूनच समाज बांधवांचा पत्ता, कुटुंब प्रमुखाचे नाव, व्यवसाय,शिक्षण, भ्रमणध्वनी क्रमांक सहजासहजी उपलब्ध व्हावेत या अनुषंगाने हा App तयार करण्याचा विचार मनात आला होता व तो विचार पुर्णत्वास जात आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे.समाजातील लोकांचे कलागुण आपल्याला कळतील व दरवर्षी जनगननेच्या पुस्तकासाठी पैसे खर्च होत आहेत, त्याची पण बचत होईल. आम्ही सर्व भोकर मधील समाजबांधव मिळून प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के सर यांच्या अध्यक्षते खाली इ.स. 2012 मध्ये पहिली तेली समाज संघटना स्थापण केली व 20 डिसेंबर 2013 रोजी श्री संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी केली आणि ती परंपरा आजतागायत चालू आहे. परंतु जयंती साठी कार्यकारणी न राहता दर महिन्याला समाजबांधवांच्या बैठका घेऊ लागलो. त्यामुळे समाजातील लोकांच्या सुखदुखात सहभागी होता आले. जमेल तेवढे समाजातील लोकांना आप आपसातील भांडण – तंटे मिटवून एकत्र आणण्याचा प्रयत्न करु लागलो. पण महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी असा वेळ देऊन विचारणे शक्य नाही म्हणून Digital सामग्रीचा वापर करुन कमी वेळा मध्ये प्रत्येक समाजबांधवांच्या समस्या सोडवता येतील या साठी App च्या माध्यमातून अल्पसा प्रयत्न चालु आहे. कमीतकमी वेळात तमाम महाराष्ट्रात असलेल्या समाज बांधवांची माहिती एक क्लिक वर मिळू शकेल. म्हणून या साठी हा App निर्माण केला आहे. आपले सहकार्य असल्याशिवाय हे कदापी शक्य नाही. आपण नेहमीच सहकार्य कराल या अपेक्षेसह हा App समाजासाठी लोकार्पित करीत आहे.
धन्यवाद !


Download ( 1.577.607 bytes)
Rate this post

Recommended for You

You may also like

Comments

Your email address will not be published. Required fields are marked *